मुक्ताईनगर;- आ. : एकनाथराव खडसे यांना आतापर्यंत धमकीचे चार ते पाच फोन आले आहेत. वेगवेगळ्या नंबरवरुन एकनाथ खडसे यांना हे धमकीचे फोन आले. तसेच, विविध देशातून फोन येत असल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी दिली आहे. नुकताच अमेरिकेतून धमकीचा फोन आल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर एकनाथ खडसे यांनी जळगावच्या मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
आमदार एकनाथराव खडसे यांच्या तक्रारीनुसार, चार वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून त्यांना 15 आणि 16 एप्रिल रोजी मोबाईलवर फोन करण्यात आले. आले. समोरील व्यक्तीने खडसे यांना हम दाउद इब्राहिम कासर कर के आदमी है, तुम छोटा शकील को मार डालो, नहीं तो तुम्हारी खैर नही, अशी धमकी देण्यात आली. त्यावर खडसे यांनी विचारले की, तुम जो ये दाउद शकील नाम ले रहे हो. ये कोण है?, मैं पहचानता नही. त्यावर समोरून बोलणार्या व्यक्तीने दाऊद, शकील ये डॉन है, और तुमको मार देंगे, असे बोलून जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी एकनाथराव खडसे यांनी चौघा मोबाईलवरून धमकी देणार्याविरुद्ध तक्रार दाखल दिली आहे. तपास सहा.निरीक्षक संदीप दुनगहु हे करीत आहेत.