अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

0

 

नशिराबाद ;- तरुणाच्या दुचाकीला भरधाव वाहनाने धडक दिली. यामध्ये मडिया भाऊसिंग भीलाला (वय २४, रा. मलगाव ता. झिरणीया म.प्र.ह.मु. भुसावळ) या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवार दि. १३ रोजी सकाळी साडेदहा वाजता नशिराबाद उड्डाणपुलाजवळील सव्र्व्हस रोडवर घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मध्यप्रदेशातील मडिय भिलाला हा कुटुंबाच्य उदरनिर्वाह करण्याच्यासाठी चार पाच वर्षापासून भुसावळ येथे वास्तव्यास आहे. शहरातील मरीमाता मंदिराजवळ सुरू असलेल्या एका बांधकाम साईडवर कुटुंबासह हा काम करुन तेथेच वास्तव्याला होता. त्याचे वडील सकाळी दखान्यात आले होते. त्यांना भेटण्यासाठनिघाला. नशिराबाद उड्डाणपुलाजवळील सर्व्हसरोडने येत असताना भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात तो गंभीररित्या जखमी झाला. नशिरबादा पोलिसांनी महामार्ग प्राधिकरणाची (नही) ची रुग्णवाहिका बोलवून त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले. रुग्णालयात पंचनामाचे कामकाज शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक रवींद्र पाटील यांनी केले. तसेच कागदपत्र नशिराबाद पोलीस ठाण्याकडे रवाना केले. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.