‘कणखर बाणा हाती भगवा आणि धनुष्यबाण’ ; शिवसेनेचे नवे प्रचारगीत प्रसिद्ध

0

मुंबई ;- “मैं मेरी शिवसेना की काँग्रेस नहीं होने दूँगा कभी नहीं!” हिंदूहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तोंडून हे उद्गार निघतात आणि शिवसेनेचे नवे प्रचारगीत सुरु होते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नवे गीत प्रदर्शित झाले आहे. यामध्ये मुख्यमंत्र्यांनी व महायुतीने केलेली विकासकामे दाखवण्यासोबतच उबाठा गटावर टीका करण्यात आली आहे. युट्यूबवर या गाणे सध्या व्हायरल होत असून अनेक जणांनी यावर सकारात्मक कमेंट्स केल्या आहेत.
‘कणखर बाणा हाती भगवा आणि धनुष्यबाण!’ असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्यामध्ये बाळासाहेबांचे “मैं मेरी शिवसेना की काँग्रेस नहीं होने दूँगा!” हे वाक्य वारंवार ऐकू येते. यातून शिवसेनेने उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले आहे. यानंतर मुख्यमंत्री शिंदेंच्या ‘ही बाळासाहेबांच्या विचारांवर आधारलेली, त्यांचे विचार पुढे नेणारी शिवसेना आहे’, या भूमिकेचा गाण्यातून पुनर्रुच्चार केला जातो. गाण्याच्या शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन देण्यात आले आहे. साडे तीन मिनिटांच्या या गाण्यात नगर विकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी केलेली कामे दिसतात. तसेच मुख्यमंत्री झाल्यानंतर विविध विकास कामांच्या उदघाटनाचे व्हिडिओही दिसतात. व्हिडिओच्या शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही छोटीशी झलक दिसते. “भारताला समृद्ध आणि विकसित बनवायचे आहे”, असे पंतप्रधान मोदी सांगताना दिसतात. शिवसेनेच्या जुन्या प्रचारगीताप्रमाणे हे गाणे नवी ओळख निर्माण करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.