सलमान खान गोळीबार प्रकरणी बंदूक पुरविणाऱ्या दोघांना अटक

0

मुंबई : – बांद्रा येथील बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घरावर गोळीबारप्रकरणी हल्लेखोरांना बंदूक पुरविणाऱ्या बिश्नोई गॅंगच्या सदस्यासह दोघांना गुरुवारी पोलिसांनी अटक केली आहे.

दोघांना घेवून मुंबईत रात्री उशिरा पथक दाखल झाले. आरोपींनी एकूण ४० काडतुसे पुरवली होती. त्यापैकी १६ काडतुसांचा शोध पोलीस घेत आहे.

सोनू सुभाष चंदर (३७) आणि अनुज थापन (३२) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. थापन हा बिश्नोई गॅंगचा सदस्य आहे. दोघेही मूळचे पंजाबचे रहिवासी असून सोनू एका किराणा दुकानात काम करतो तर थापन क्लिनर म्हणून काम करतो. दोघांनी १५ मार्च रोजी दोन बंदूक, चार मॅगझीन आणि ४० काडतुसे हल्लेखोर विकी गुप्ता आणि सागर पाल या आरोपीना पुरवली.

Leave A Reply

Your email address will not be published.