पाथरी शिवारात रान डुकराच्या हल्ल्यात दोन मजूर जखमी

0

जळगाव :- ज्वारी कापण्याचे काम सुरू असतांना रानडुकराने हल्ला केल्याने दोनजण गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील पाथरी शिवारातील शेतात गुरूवारी २५ एप्रिल रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली . जखमींना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

पाथरी गावात अमर राजाराम बारेला (वय १९) आणि दिनू मोलशा बारेला (वय २०) अशी दोन्ही जखमींची नावे आहेत . गुरूवारी २५ एप्रिल रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास पाथरी शिवारातील शेतात ज्वारी कापण्याचे काम करत असतांना त्यांच्यावर रानडुकराने हल्ला केला. यात हल्ल्यात अमर बारेला यांच्या डोक्याला, कमरेला आणि हाताला चावा घेतला तर दिनू बारेला याच्या हाताचे बोटच रानडुकराने तोडून य मांडीवर मोठी जखम केले आहे.

जखमी झालेल्या दोघांना तातडीने व खासगी वाहनाने जळगाव येथील व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले ए आहे. यासाठी गावातील पोलीस पाटील संजीव लंगरे सहकार्य केले. याप्रकरणी अद्याप पोलीसातप कोणतीही नोंद करण्यात आलेली ड नाही. वनविभागाचे वनरक्षक जितेंद्र च चिंचोले यांनी जखमींशी चौकशी केली .

Leave A Reply

Your email address will not be published.