मतदार देताहेत स्मिताताई वाघ यांना विजयाची गॅरंटी

0

जळगाव : जळगाव लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांचा   शिस्तबद्ध प्रचार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाची होत असलेल्या प्रगतीची भुरळ मतदारांवर पडलेली दिसून येत आहे. यामुळे मतदारांकडून स्मिताताई वाघ यांना विजयाची गॅरंटी मिळत असल्याचे चित्र आहे.

मतदार संघातील जळगाव, अमळनेर,चाळीसगाव,पाचोरा,भडगाव, पारोळा,एरंडोल,धरणगाव तालुक्यातील गावपातळीवर भाजपने दमदार  कार्यकर्त्याची मोठी फळी उभारली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जनहिताच्या कामांची माहिती कार्यकर्त्यांकडून मतदारांना दिली जात असून डोअर टू डोअर मतदारांना भाजपचा जाहीरनामा दिला जात आहे.
विशेष म्हणजे भाजपा सोबत  शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), रिपाई या महायुतीचे कार्यकर्ते स्मिताताई वाघ यांच्या प्रचारात उतरल्याने जळगाव लोकसभा मतदार संघात स्मिताताई वाघ या विक्रमी मतांनी विजयी होतील असे  चित्र दिसून येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.