मनपा आयुक्तांबाबत ६ रोजी कामकाज

0

जळगाव;-  नवी मुंबई येथील नगरपरिषद प्रशासन संचालनालय येथे तत्कालिन आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांची बदली  उपायुक्त पदी करण्यात आली होती. या बदलीच्या आदेशाविरोधात डॉ. गायकवाड यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात (मॅट) याचिका दाखल केली होती. त्यामुळे मॅट कोर्टाने दि.२५ एप्रिलपर्यंत प्रतिवादींना प्रतिज्ञापत्रातून म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले होते.

तसेच महापालिकेचे जैसे थे परिस्थितीत कामकाज सुरु ठेवण्याचे निर्देशदिले होते. परंतु प्रतिवादी यांच्याकडून दि.२५ एप्रिलपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले नसून पुन्हा मुदत वाढ मागण्यात आल्यामुळे मॅट कोर्टान त्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी दि. ६ पर्यंत मुदत वाढ दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.