रेल्वेखाली आल्याने अनोळखी तरुणाचा मृत्यू

0

जळगावः;– एका धावत्या रेल्वेने दिलेल्या धडकेत एका ३५ वर्षीय अनोळखी तरूणाचा मृत्यू झाला. गुरुवारी २५ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास तालुक्यातील भादली रेल्वे स्थानकाजवळ आढळून आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तालुक्यातील भादली रेल्वेस्थानकाजवळील रेल्वे खंबा क्रमांक ४१६ जवळ एका धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने अनोळखी ३५ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना गुरूवारी २५ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता उघडकीला आले आहे याबाबत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांचे मार्गदर्शनाखाली पोकॉ प्रवीण लोहार हे तपास करीत आहेत. मृतदेहाची ओळख पटविण्याचे आवाहन नशिराबाद पोलिसांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.