अखेरच्या दिवसापर्यंत जळगांवसाठी 25 उमेदवारांनी 36 अर्ज दाखल तर रावेरसाठी 31 उमेदवारांनी दाखल केले 45 अर्ज

0

जळगाव :-लोकसभा निवडणूक 2024 चे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दि.25 एप्रिल रोजी जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 17 उमेदवारांनी 21 अर्ज भरले तर रावेर साठी 11 उमेदवारांनी 18 अर्ज भरले. गुरुवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने शेवटच्या दिवसांपर्यंत जळगांव लोकसभा मतदार संघात एकूण 25 उमेदवारांनी 36 अर्ज दाखल केले आहेत.

रावेर लोकसभा मतदार संघात
31 उमेदवारांनी 45 अर्ज दाखल केले आहेत.
गुरुवार दि 25 रोजी जळगांव लोकसभा मतदार संघांसाठी 03 उमेदवारांनी 06 अर्ज घेतले. तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी 02 उमेदवारांनी 03 अर्ज घेतले. अखेरच्या दिवशी जळगांव लोकसभा मतदार संघांसाठी शैलेश यशवंत देसले यांनी रोहित दिलीप निकम (भारतीय जनता पार्टी ) यांचेसाठी 02,अमोल निंबाजी वानखेडे यांनी राजेंद्र समाधान वानखेडे, भुसावळ (अपक्ष )यांचेसाठी 3, प्रतीक सुधाकर राजपूत, पारोळा (अपक्ष )1 अर्ज घेतले. तर रावेर लोकसभा मतदार संघांसाठी प्रभाकर पंढरी साळवे, जामनेर (अपक्ष )1, ललित गुणाजी बोडे, रावेर (भारतीय जनता पार्टी )2 अर्ज घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.