पाचोरा येथे ऑनलाईन जुगारावर पोलिसांचा छापा

0

पाचोरा;- शहरातील जारगाव चौफुली येथे ऑनलाईन जुगार, सद्याच्या पिढीवर पोलिसांनी धाडी टाकत त्याठिकाणाहून ३१ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत चार जणांविरुद्ध पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील खडकदेवळा रोडवरील जारगाव चौफुली येथे अवैधरीत्या ऑनलाईन जुगार व सट्टा मटका खेळला जात असल्याची माहिती पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांना मिळाली होती. त्यांनी पोलीस हवालदार राहुल शिंपी व योगेश सुरेश पाटील यांना घटनास्थळी रखाना केले,

तेव्हा पथकाने घटनास्थळावरून दोन ऑनलाईन जुगार अड्ड्यांवर ३१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल व दोन सट्टा मटका घेणाऱ्या कडून ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ऑनलाईन जुगार अड्ड्यांवरील प्रदीप पाटील रा. जारगाव, संदिप सूर्यवंशी रा. मिलिंद नगर तसेच सट्टा मटका पेढीवरील मोतीलाल पुसरणानी रा. सिंधी कॉलनी, पाचोरा व संजय चव्हाण रा. कोंडवाडा गल्ली, पाचोरा यांचे विरुद्ध पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.