भरधाव दुचाकीच्या धडकेत वृद्ध गंभीर जखमी

0

जळगाव : वळण घेत असतांना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीस्वाराने वृद्धाला जोरदार धडक दिली. या अपघातात सुरेश शंकर सोनवणे (वय ७२, रा. देविदास कॉलनी) हे गंभीर जखमी झाले. ही घटना स्वातंत्र्य चौकातील अश्विनी मेडीकल समोर शनिवारी रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास घडली.

याप्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. शहरातील देविदास कॉलनीत सुरेश शंकर सोनवणे (वय ७२) हे वास्तव्यास असून ते कर सल्लागार आहेत. दि. ४ मे रोजी रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास सुरेश सोनवणे हे (एमएच १९, सीऐ १७१) क्रमांकाच्या दुचाकीने स्वातंत्र्यचौकाकडून भास्कर मार्केटकडे जात होते. अश्विनी मेडीकल समोरुन वळण घेत असतांना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या (एमएच १९, डीएस ९५७१) क्रमांकाच्या दुचाकीस्वाराने सोनवणे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात सोनवणे हे रस्त्यावर पडल्याने त्यांचा उजव्या पायाच्या गुडघ्याजवळ गंभीर दुखापत झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.