कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या गाईंची पोलीसांच्या सतर्कतेने सुटका

0

पारोळा –पारोळा शहरातील अमळनेर रस्त्यावर शुक्रवारी पहाटे मालेगाव येथे कत्तलीसाठी अवैधरित्या गायींची पोलीसांच्या सतर्कतेने सुटका करण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी की पारोळा शहरातील अमळनेर रस्त्यावर पहाटेच्या सुमारास तब्बत १२ गायींची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

पारोळा शहरातुन जनावरांना कत्तलीसाठी घेऊन जाणारा पिकअप वाहन आज शुक्रवारी सकाळी पहाटे ३ वाजेचा सुमारास मालेगाव येथे कत्तीलीसाठी घेवुन जाणाऱ्या गाई पकडण्यात पारोळा पोलिसांना यश आले आहे.

तत्पूर्वी, अवैधपणे गुरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती अमळनेर पोलिसांनी पारोळा पोलिस स्टेशनला दिली होती. यावरून पारोळा पोलिस स्टेशनचे कर्मचारी अभिजित पाटील यांनी गौरक्षक समाधान धनगर यांना कळवले असता अमळनेर रोड शनीमंदीराजवळ अवैधपणे गुरांची वाहतूक करणारी गाडी पकडण्यात आली. गायींना पिकअप वाहनातून निर्दयतेनेपणे कोंबून वाहतूक केली जात असल्याचे यावेळी निर्देशनास आले गाडी उभी केली असता
गाडीतील चालक फरार झाला क्लिनरला मात्र पारोळा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या गायींना अमळेनर येथील गौशाळेत रवाना करण्यात आले. यावेळी शाम पाटील, बजरंग दलचे जयवंत चौधरी व शेलेश पाटील तसेच अमळनेर येथील पोलिस कर्मचारी पुनम हाटकर, यांच्या मदतीने सदर कारवाई करण्यात आली. पुढील तपास पारोळा पोलिस करीत आहेत

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.