मतदान केंद्रावर नियुक्त आदेश रद्द करण्यासाठी 732 जणांचे अर्ज ; अर्ज पडताळणीनंतर 421 जणांचे मान्य , 311 अमान्य

0

जळगांव;- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने मतदान बूथवर नेमणूक केलेल्या जामनेर,चाळीसगाव,भुसावळ, मुक्ताईनगर,धरणगाव व अमळनेर विधानसभा मतदारसंघातील एकूण 732 अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून विविध अपरिहार्य कारणासाठी नेमणूक रद्द करण्याची विनंती करण्यात आली होती. त्या कारणाची पडताळणीत करून 421 जणांची नेमणूक रद्द करण्यात आली तर 311 जणांच्या विनंती अमान्य करण्यात आल्या आहेत. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जिल्हाभरातील शासकीय कर्मचाऱ्यांची ड्युटी लावण्यात आली होती.

यापैकी जामनेर,चाळीसगाव,भुसावळ,मुक्ताईनगर,धरणगाव व अमळनेर विधानसभा मतदारसंघातील एकूण 732 कर्मचाऱ्यांचे विविध गंभीर कारणास्तव निवडणूक ड्युटी रद्द करणे बाबतचे विनंती अर्ज प्रशासनाकडे प्राप्त झाले होते.त्यापैकी 421 कर्मचाऱ्यांचे निवडणूक ड्युटी आदेश पडताळणी केल्यानंतर रद्द करण्यात आले आहेत.तर 311 अर्ज प्रस्तावित करण्यात आलेले नाहीत. निवडणूक ड्युटी आदेश रद्द केलेल्या 421 जणांमध्ये प्लॅनिंग आणि रिपोर्टिंग ऑफिसर ( पीआरओ ) 88,प्रथम निवडणूक अधिकारी 77 ( एफपीओ ) आणि 252 ओपीओ आणि 4 मतदान कर्मचारी यांचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.