जवानांना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात ; दहा जवान गंभीर

0

गडचिरोली : – छत्तीसगडमध्ये मतदारांच्या सुरक्षेसाठी तैनात जवानांना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला आहे. चालकाचे गाडीवरील सुटल्यामुळे हा अपघात झाला आहे. या बसमध्ये एकूण 40 जवान होते. यापैकी दहा जवान गंभीर जखमी झाले असून त्यातील तीन जवानांची परिस्थिती चिंताजनक आहे. छत्तीसगड राज्यात मतदान झाल्यानंतर निवडणूक ड्युटी लावलेल्या सीआरपीएफच्या जवानांना घेऊन ही बस दंतेवाडा येथून जगदलपूरकडे निघाली असताना हा अपघात झाला.

या जवानांची नियुक्ती ही छत्तीसगडमध्ये मतदारांच्या सुरक्षेसाठी करण्यात आली होती. राज्यात मतदान संपल्यानंतर या जवानांना घेऊन ही बस दंतेवाड्यावरून जगदलपूरकडे निघाली होती. मात्र रस्त्यात चालकाचं नियंत्रण सुटून हा भीषण अपघात झाला. दंतेवाडा जिल्ह्यातील तोकापाल राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला आहे. या अपघातातील जखमींना तातडीने जगदलपूर येथील मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.