राज्यातील 13 आणि देशातील 49 मतदार संघातील जागांसाठी आज मतदान परतिबंधात्मक

0

मुंबई: लोकसभानि वडणुकीच्या राज्यातील पाचव्या व शेवटच्या टप्प्यातील १३ मतदारसंघांत आज, सोमवारी मतदान होत आहे.

या टप्प्यामध्ये धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर पूर्व (ईशान्य) मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण ग मध्य मुंबई, दक्षिण मुंबई या १३ लोकसभा मतदारसंघांतील २ कोटी ४६ लाख ६९ हजार ५४४ मतदार एकूण २६४ उमेदवारांमधून आपला प्रतिनिधी निवडणार आहेत. पाचव्या टप्यात महामुंबईतील १० मतदारसंघांत मतदान होत आहे.

 

लोकसभा निवडणुकीचे महाराष्ट्रात चार टप्पे पार पडले आहेत. त्यात ३५ लोकसभा मतदारसंघांत मतदान झाले आहे. आता सोमवार, २० मे रोजी राज्यातील १३ लोकसभा मतदारसंघांत सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होत आहे. पाचव्या टप्प्यात १ कोटी ३१ लाख पुरुष मतदार, तर १ कोटी १५ लाख महिला मतदार, तर २७४० तृतीयपंथी असे एकूण २ कोटी ४६ लाख ६९ हजार ५४४ मतदार मतदान करतील. दरम्यान, या निवडणुकीसाठी लागणारे साहित्य, साधनसामग्री निवडणूक आयोगाने मतदान केंद्रांवर पुरवलेली आहे. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी व अधिकारी पुरवण्यात आले आहेत. सोबतच पोलीस तैनात करण्यात आले असून, सर्व २४ हजार ५७९ मतदान केंद्रांवर कडकठेवण्यात आला आहे. उन्हाचा त्रास होऊ नये किंवा अवकाळी पावसाचा फटका बसू नये, म्हणून मतदान केंद्रांवर मंडप, पाण्याची सोय व प्राथमिक उपचाराची सोय उपलब्ध करून देण्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिली आहे. पाचव्या टप्प्यातील मतदान होताच राज्यातील लोकसभेची रणधुमाळी संपणार आहे.

 

राज्यात आज होणाऱ्या मतदानासाठी मतदार
असलेले सर्व शासकीय, निमशासकीय व खासगी कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना कारखाने, दुकाने तसेच खासगी कंपन्यांची आस्थापना, सर्व दुकाने, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम, तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स यांमधील कार्यरत कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी लागू असणार आहे. अत्यावश्यक सेवेतील कामगार, अधिकारी-कर्मचारी इत्यादींना मतदानासाठी दोन ते तीन तासांची सवलत दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.