दाम्पत्याला मारहाण करून केला महिलेचा विनयभंग ; चौघांविरुद्ध गुन्हा

0

अमळनेर ;- तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या ३९ वर्षीय महिलेसह तिच्या पतीला दारूच्या नशेत येवून मारहाण करून महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमळनेर तालुक्यातील एका गावात ३९ वर्षीय महिला ही आपल्या पतीसह वास्तव्याला आहे. १८ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता अधिकार मधुकर भिल हा दारू पिऊ आला. त्यावरून महिलेन अधिकार भिल याला घरी जा असे सांगितले. याचा राग आल्याने अधिकार मधुकर भिल, रामेश्वर अधिकार भील, यांनी महिलेसह तिच्या पतीला शिवीगाळ करत दोघांना मारहाण केली. तर यातील अधिकार भिल आणि रामेश्वर भील यांनी महिलेचा विनयभंग करत गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र तोडून नुकसान केले. याप्रकरणी महिलेने २४ एप्रिल रोजी दुपारीअमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ विजय भोई हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.