सावखेडासीम येथे गावठी दारू अड्ड्यावर धाड ; ५१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

0

यावल : -तालुक्यातील सावखेडसीम येथे हातभट्टी उद्धवस्थ करण्यात आली असून ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. हि कारवाई

स्थानिक गुन्हे शाखा व यावल पोलिसांच्या पथकाने केली. यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सावखेडासीम, ता.यावल या गावात नाल्याच्या काठी युसूफ तडवी हा गावठी हातभट्टीची दारू गाळणी करीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार प्रमोद लाडवंजारी व यावल पोलिसांनी संयुक्तरीत्या त्या ठिकाणी कारवाई केली व तेथून गावठी हातभट्टीचे कच्चे रसायन व विविध साहित्य आणि गावठी दारू असा एकूण 51 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात हवालदार प्रमोद लाडवंजारी यांच्या फिर्यादीवरून युसूफ तडवी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस अधीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र पवार करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.