विवाहितेवर जबरदस्तीने अत्याचार ; एकाविरुद्ध गुन्हा

0

एरंडोल;- – सासरी विवाहिता घरात एकटी असल्याचा फायदा घेऊन तिच्याच नातेवाईकाने घरात घुसून जबरदस्तीने अत्याचार केल्याचा प्रकार तालुक्यातील एका गावात घडला असून याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांची दिलेली माहिती अशी कि एरंडोल तालुक्यातील एका गावात सासर असलेल्या विवाहिता हिचे माहेर नागपूर येथे असून तिचाच नातेवाईक विवाहितेच्या घराजवळ राहायला आहे.विवाहिता घरी एकटी असतांना संशयित हा जेवणासाठी विवाहितेच्या घरी गेला होता. त्यावेळी एकटी असल्याचा गैरफायदा घेत तिच्यावर जबरी अत्याचार केला. त्यानंतर त्याने दमबाजी करत तिच्यावर वारंवार अत्याचार केला. हा प्रकार विवाहितेने तिच्या पतीला सांगितला. त्यामुळे तिच्या पतीने तिचे म्हणणे एकूण न घेता पीडितेला नागपूर येथे माहेरी पाठवून दिले. त्यानंतर संशयित आरोपीने विवाहितेला फोन करून परत गावाला येण्याची धमकी देऊन फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.अखेर विवाहितेने कासोदा पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पांडूरंग पवार हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.