Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • गोकुळचा सत्तासंघर्ष : सहकाराच्या नावाखाली सत्ताकारणाचा डाव!
    • ‘चित्रपताका’तून लेखक आणि तरुण चित्रपटकर्मींना अभिव्यक्तीची संधी!
    • इमारतीतील रहिवाशांसाठी दिवाळीची ठरली काळ रात्र
    • शहरे गुदमरली; नागरिकांचा श्वास कोंडला!
    • एक्सप्रेसवेवर बस ४० फूट खोल कोसळली; ३ जणांचा मृत्यू
    • गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू
    • रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
    • गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»अज्ञात वाहनाच्या धडकेत निमखेडी खुर्द गावातील दाम्पत्य जागीच ठार…
    जळगाव जिल्हा

    अज्ञात वाहनाच्या धडकेत निमखेडी खुर्द गावातील दाम्पत्य जागीच ठार…

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 23, 2024No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क;

     

    मुक्ताईनगर तालुक्यातील खामखेडा पुलाजवळील चमत्कारी हनुमान मंदीरासमोरून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाच्या धडकेत निमखेडी खुर्द गावातील दाम्पत्य जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी २३ एप्रिल रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली आहे. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक वाहन घेवून घटनास्थळावरून पसार झाला आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुभाष रामराव घोडकी (४०) आणि त्यांची पत्नी सोनूबाई सुभाष घोडकी (३४) दोन्ही रा. निमखेडी खुर्द ता. मुक्ताईनगर असे मयत दाम्पत्याचे नाव आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी की, मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी खुर्द गावात सुभाष घोडकी आणि त्याची पत्नी सोनुबाई घोडकी हे वास्तव्याला आहे. दोघे पतीपत्नी हे मध्यप्रदेशातील फोपनार येथे नातेवाईकांकडे दुचाकीने गेले होते. आज मंगळवारी २३ एप्रिल रोजी दुपारी ते निमखेडी खुर्द येथे येण्यासाठी दुचाकी क्रमांक (एमएच १९ इएफ ९२११) ने निघाले होते. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास खामखेडा पुलाजवळील चमत्कारी हनुमान मंदीरासमोरून जात असतांना त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात सुभाष घोडकी आणि सोनूबाई घोडकी हे दाम्पत्य ठार झाले. तर अपघात घडल्यानंतर अज्ञात वाहनधारक हा वाहन घेवून पसार झाला आहे. याप्रकरणी मयताचा पुतण्या प्रविण मोतीलाल घोडकी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे निमखेडी खुर्द गावात हळहळ व्यक्ती केली जात आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #muktainagar Accident News Couple Died In Accident jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू

    November 9, 2026

    रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी

    November 9, 2026

    कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ

    November 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif