पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क;
पारोळा तालुक्यातील सार्वे गावाजवळ झालेल्या रस्ते अपघतात आई व मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पुनम प्रतिक पाटील (२४) व अगस्य प्रतिक पाटील (१) असे मयत झालेल्या आई व मुलाचे नाव आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, शहादा येथील रहिवासी प्रतिक सुनिल पाटील हे आपल्या मित्राच्या लग्नासाठी चिखलोडहुन एरंडोलकडे जात असताना सार्वे गावाजवळ त्यांची मोटारसायकल स्लिप झाली. त्यामुळे त्यांच्या सोबत असलेले त्यांची पत्नी व मुलगा देखील खाली पडले. मात्र याचवेळी मागून येणाऱ्या डंपरने पुनम प्रतिक पाटील (२४) व अगस्य प्रतिक पाटील (१) यांना चिरडले. यादरम्यान दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात प्रतिक सुनिल पाटील (३०) यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.