पाळधी, ता. धरणगाव : टाकरखेडा शिवारात खेडी-कढोली रस्त्यावर टेकडीच्या आडोशाला गावठी दारू तयार होत असल्याची माहिती येथील पोलीसांना मिळाल्यानंतर त्यांनी तेथे धाड टाकून दोन महिलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पहिल्या गुन्ह्यात रवींद्र इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार टाकरखेडा येथील कल्पना रणजित मोरे यांच्या १० हजार ८०० रुपयांचे कच्चे रसायन तर दुसऱ्या गुन्ह्यात ज्ञानेश्वर सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार टाकरखेडा येथीलच रत्नाबाई बाबू जाधव यांच्याकडे ९ हजार ६०० रुपयांचे कच्चे रसायन नष्ट करण्यात आले आहे. या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास स.पो.नि. सचिन शिरसाठ यांच्या मार्गदर्शनात विजय चौधरी व त्यांचे सहकारी करत आहेत.