जळगाव ;- येथे 4 वर्षापूर्वी सुरु झालेल्या गव्हर्नमेन्ट मेडिकल कॉलेज मधून एमबीबीएस पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या 100 डॉक्टरांचा पदवीदान समारंभ मंगळवारी पार पडला. येथील संभाजी राजे नाटय सभागृहात पार पडलेल्या या पदवीदान सोहळया निमित्त श्र्ज्याचे राज्यपाल रमेश्ाा बैस यांनी व्हीडीओ कॉन्फरन्स व्दारे संबोधित करुन या 100 डॉक्टरांना श्ुाभेच्छा दिल्या. पदवी घेऊन रुग्णसेवेसाठी बाहेर पडणाऱ्या या तरुण डॉक्टरांनी रुग्णांकडे दयाळूपणे पहावे असा महत्वाचा संदेश्ा राज्यपाल बैस यांनी दिला. राज्यपाल रमेश्ा बैस यांचा हा संदेश्ा सध्याच्या विज्ञान युगात अत्यंत महत्वाचा आहे. त्याचबरोबर रुग्णांची चिंता, त्यांचे आंतरमन समजून घेऊन सेवा द्या असेही बैस यांनी आपल्या संदेश्ारत म्हटले आहे. अलिकडे डॉक्टरकीची महागडी पदवी घेऊन बाहेर पडलेल्या डॉक्टरांनी सेवेच्या माध्यमातून जरुर पैसा कमवावा परंतु पैसे कमवतांना आपण आपली माणुसकी जपली पाहिजे. डॉक्टरांमधल्या माणुसकीलाचा देव मानले जाते परंतु ही माणुसकी लोप पावत चालली आहे. त्या माणुसकीचा लोप होऊन नये तसा जणू राज्यपाल महोदयांच्या संदर्भाचा अर्थ आहे. त्यामुळे राज्यपाल महोदयांनी जीएमसी मधून पदीवी घेऊन बाहेर पडणाऱ्या या तरुण डॉक्टरांसाठी राज्यपाल महोदयाचा संदेश्ा महत्वाचा वाटतो.रुग्ण आणि त्या रुग्णाचे उपचार करुन त्यांना रोगमुक्त करणे हे डॉक्टर यांच्यावरील सौहार्दाचे, प्रेमाने नाते असणे अत्यंत महत्वाचे आहे.
विज्ञान युगात रोगावर अनेक उपचार होऊन रोग बरे होऊ श्ाकतात. वैद्यकीय उपचारा अभावी कुठलाही रुग्ण दगावणार नाही अश्ाी सद्यस्थिती आहे. रुग्णांच्या मध्ये सुध्दा एकप्रकाराची जागरुकता निर्माण झालेली आहे. एवढे असून सुध्दा सर्वप्रकारच्या रोगाची लागण असणाऱ्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाटयाने वाढ होत आहे. अनेक प्रकारचे हॉस्पिटलची निर्मिती होत असून सर्व हॉस्पिटलमध्ये रुग्णसंख्या हाऊसफुल्ल असते अश्ाी परिस्थिती आहे. गेल्या दश्ाकात मल्टीस्पेश्ाॉलिटी हॉस्पिटलच्या संख्येत कमालीची वाढ झालेली आहे. हे कश्ााचे द्योतक आहे. डॉक्टर आणि रुग्णाचे नातेवाईक यांच्यात अनेक वेळा कमालीचे ताणतणावाचे वातावरण निर्माण होते. हा प्रकार पोलिस स्टेश्ान पर्यंत जाते. हे प्रकार थांबले पाहितेत म्हणूनच राज्यपाल महोदयांच्या रुग्णांकडे दयाळूपणे पहा हा संदेश्ा महत्वाचा आहे.
जळगावचेच सरकारी वैद्यकीय महाविद्यालय चार वर्षापूर्वी सुरु झाले तेव्हा जिल्हा सरकारी रुग्णालयात हे वैद्यकीय महाविद्यालय सुरु झाले तेव्हा वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी श्ािक्षणाच ज्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत त्यातून दर्जेदार श्ािक्षण मिळेल का ? आणि अश्ाा महाविद्यालातून बाहेर पडणाऱ्या डॉक्टरांचा दर्जा कसा असेल ? अश्ाा प्रकारचे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. तथापि त्याही परिस्थितीवर मात करुन एमबीबीएसचे श्ािक्षण दिले गेले.सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या होस्टेलचा प्रश्न निर्माण झाला होता. श्ािकविण्यासाठी जळगाव सारख्या ठिकाणी प्राध्यापक येण्यास तयार नव्हते. विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी जे जे इक्विपेमेंट हवे होते त्याची उपलब्धता नव्हती. क्लास रुम पुणे-मुंबईच्या दर्जाचे नव्हते. परंतु यावर मात करुन एमबीबीएस डॉक्टरांची पहिली बॅच बाहेर पडली आणि त्यांना पदवीदान सोहळा थाटात पार पडला ही बाब अभिनंदनीय आहे. आता तर जळगावचे वैद्यकीय महाविद्यालय प्रश्ास्त अश्ाा जागेत पुढील वर्षापासून सुरु होईल. 55-60 एकरच्या जागेत जळगाव लगत चिंचोली श्ािवारात प्रश्ास्त असे मेडिकल हब निर्माण होत आहे. विश्ोष म्हणजे सर्व प्रकारच्या पॅथीची महाविद्यालयांची उभारणी करुन त्याचे श्ािक्षण तिथे मिळणार आहे. महाविद्यालयाच्या भव्य इमारती प्रश्ास्त असे मुला-मुलींचे वस्तीगृहे, वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना,अधिकाऱ्यांना तसेच डॉक्टरांना राहण्यासाठी क्वॉर्टर्स असणार आहे. होमीओपॅथीचे महाराष्ट्रातील पहिले महाविद्यालय या मेडिकल हे हबमध्ये असणार आहे. त्यामुळे आताच्या जीएमसी 100 डॉक्टरांना श्ािक्षण घेण्यासाठी जो त्रास झाला तो यापुढे होणार नाही 100 डॉक्टरांना श्ािक्षण घेण्यासाठी जो त्रास झाला तो यापुढे होणार नाही तसेच जळगावच्या मेडिकल हबमुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील रुग्ण येथे उपचारासाठी येतील त्यामुळे जळगावच्या दळण-वळणात फार मोठा फरक पडणार आहे.