केंद्रीय मंत्री नारायण राणे लोकसभेच्या रिंगणात

0

रत्नागिरीचा बहुप्रतीक्षित तिढा सुटला : शिवसेनेचा गड भाजपकडे

रत्नागिरी ;- रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा बहुप्रतीक्षित तिढा अखेर सुटला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे रत्नागिरीचे विद्यमान खासदार आणि महाविकास आघाडीतर्फे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार विनायक राऊत यांच्याविरुद्ध नारायण राणे हे महायुतीचे उमेदवार असतील. एकीकडे शिवसेना नेते उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत किरण भैय्या सामंत यांची उमेदवारी मागे घेत असल्याची घोषणा केली. त्याचवेळी भाजपकडून राणेंना तिकीट जाहीर करण्यात आले आहे.
भाजपने उदयनराजे भोसले, पियुष गोयल यांच्यापाठोपाठ महाराष्ट्रातून आणखी एका राज्यसभा खासदाराला लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरुन शिवसेना-भाजपमध्ये रस्सीखेच सुरु होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस तोंडावर असतानाही हा तिढा सुटलेला नव्हता. भाजपकडून नारायण राणे यांचे एकमेव नाव चर्चेत होते. तर शिवसेनेकडून मंत्री उदय सामंत यांचे थोरले बंधू किरण सामंत यांच्या नावाची चर्चा होती. परंतु शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावर अखेर भाजपने झेंडा रोवत राणेंना मैदानात उतरवले आहे.

नारायण राणे यांची कारकीर्द
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील वरवडे गावचे सुपुत्र असलेले नारायण राणे हे सरकारी नोकरी सोडून 1975 ते 80 च्या दरम्यान शिवसेनेचे शाखाप्रमुख झाले. त्यानंतर 1985 साली नगरसेवक म्हणून समितीच्या मुंबई महानगरपालिकेच्या बेस्ट समितीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मधून बाळासाहेबांनी त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली आणि कणकवली या विधानसभा मतदारसंघातून 1990 साली ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून गेले. त्यानंतर 1990 पासून 2005 आणि 2009 साली त्यांनी कुडाळ मतदारसंघातून विजय मिळविला. जेव्हा ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले, तेव्हा त्यांनी शिवसेना गावोगावी वाढवली. कोकणात शिवसेना वाढवण्यात राणे यांचा वाटा मोठा मानला जातो. 1995 मध्ये ज्यावेळी युतीची सत्ता आली तेव्हा थेट नारायण राणे राज्यात कॅबिनेट मंत्री बनले.

Leave A Reply

Your email address will not be published.