लग्नाचे आमिष दाखवीत महिलेवर अत्याचार

0

जळगाव ;- शहरातील एका परिसरात राहणाऱ्या २३ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कदायक प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील एका भागात २३ वर्षीय महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्याला असून ८ मार्च २०२३ रोजी महिलेची ओळख विकास प्रकाश अडकमोल रा. गेंदालाल मिल, जळगाव याच्याशी झाली. विकासने महिलेचा ओळखीचा फायदा घेत जवळीक साधली. त्यानंतर तिला लग्नाने आमिष दाखवत तिच्यावर वारंवार अत्याचार केला. त्यानंतर तिला शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. हा प्रकार सहन न झाल्याने अखेर पिडीत महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात विकास अडकमोल याच्या विरोधात फिर्याद दिली. त्यानुसार बुधवारी १ मे रोजी रात्री १० वाजता विकास प्रकाश अडकमोल वय २३ रा. गेंदालाल मिल, जळगाव याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दयानंद सरवदे हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.