जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव शहरातील सर्व नागरिकांसाठी महत्वाची बातमी आहे. पाणी पुरवठा विभाग जळगाव शहर महानगरपालिका यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहराचा पाणी पुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मर्या., यांचेकडून वाघुर पंपींग व उमाळा जलशुध्दीकरण केंद्र विद्युत वाहीनी वरील झाडांच्या फांद्या तोडणे, विद्युत वाहीनी दुरुस्तीची कामे दि.१८/०५/२०२४ रोजी करण्यात येणार असल्याने जळगाव शहराचा पाणी पुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात येत असून दि.१८/०५/२०२४ रोजीचा पाणी पुरवठा दि.१९/०५/२०२४ रोजी करण्यात येईल. तसेच दि. १९/०५/२०२४ रोजी व २०/०५/२०२४ रोजीचा पाणी पुरवठा अनुक्रमे दि.२०/०५/२०२४ व २१/०५/२०२४ रोजी करण्यात येईल. तरी नागरीकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा व महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.