Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»चिनावल येथे वादाचे रूपांतर तुफान दगडफेकीत ; २० पर्यंत संचारबंदी , गावात तणावपूर्ण शांतता
    गुन्हे वार्ता

    चिनावल येथे वादाचे रूपांतर तुफान दगडफेकीत ; २० पर्यंत संचारबंदी , गावात तणावपूर्ण शांतता

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 18, 2024Updated:May 18, 2024No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चिनावल, लोकशाही न्युज नेटवर्क 

    सावदा येथून जवळच असलेल्या चीनावल येथे महादेव वाड्या जवळ किरकोळ वादाचे रूपांतर दगडफेकीत झाल्याची घटना रात्री नऊ विजेच्या सुमारास घडली.

    किरकोळ कारणावरून समाजकंटकांनी गावात एकमेकांच्या अंगावर धावून जात दगडफेक केल्याने महिला व लहान मूला मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे सदर प्रकारामुळे गावातील शेकडो स्त्री पुरुष रस्त्यावर उतरून येथील पोलिस चौकी समोर ठिय्या मांडून दगडफेक करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी लावून धरली होती. सदर घटनेची माहिती सावदा पो स्टे चे सपोनी जालिंदर पळे यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तात्काळ जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, मुक्ताईनगर विभागाचे उपविभागीय अधिकारी राजकुमार शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक नखाते, फैजपूर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सिह आपल्या फौजफाट्यासह घटना स्थळी उपस्थित होत परिस्थिती नियंत्रणात आणली

    दरम्यान घटना कशामुळे घडली ह्याचा तपास पोलीस करीत असून रात्री उशिरा येथील एका माधुरी महाजन या महिलेने सावदा पोलिस स्टेशन ला या बाबत तक्रार दाखल केली यात रात्री 8 ते 9 वाजेदरम्यान मी वाॅकिग करीत असताना वाघोदा रोड ते मेस्को मळा परिसरात मोठ्याने आरडाओरडा चालू असल्याचा आवाज येत असल्याने मी व माझे सोबत असलेली वर्षा महाजन आमचे कडे मोठा जमाव दगडफेक करीत पळत येऊन लज्जा येईल असे वर्तन केले. तसेच महादेव वाडा, महाजन वाडा परिसरात दगडफेक करीत मोटरसायकलचे पण नुकसान केले याच दरम्यान माझे 2 तोळे सोन्याचे मंगळसूत्र पण तोडले गेले आहे.  यात सदर महिलेने 4 व्यक्तींची नावे सांगितली असून दिडशे ते दोनशे जणांचा जमाव पळत येत होता असे तक्रारीत  नमूद केले आहे

    दरम्यान भादवि कलम 392 ,354 ,व 427 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आले . या नतंर रात्री उशीरा फैजपूर उपविभागीय अधिकारी फैजपूर यांनी चिनावल येथे दिनांक 18 चे मध्यरात्री पासून दि 20 मे च्या रात्री 1 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केल्याचा आदेश पारित केला आहे

    आज दि 18 रोजी गावात पूर्णपणे व्यवहार बंद असून संचारबंदी बंदी मुळे जनजीवन विस्कळित झाले आहे शेतात जाणारे शेतमजूर, दैनंदिन उघडणारे आस्थपने , किराणा,दुध डेअरी,हे बंद असून रस्त्यावर शुकशुकाट आहे . तर गावात स्थानिक सावदा पोलिस सह फैजपूर,निभोरा,रावेर येथुन अतिरिक्त कुमक तसेच राज्य राखीव दलाचे जवान गावात तगडा बंदोबस्त ठेवून आहेत . मुक्ताईनगर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी राज कुमार शिंदे,सपोनि जालिंदर पळे,पो उप निरीक्षक खांडबहाले,गर्जे हे तळ ठोकून आहेत परिस्थिती नियंत्रणात असली तरी गावात तणाव कायम आहे.

    चिनावल येथे शुकशुकाटाचे वातावरण
    काल रात्री झालेल्या दगडफेक नतंर परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून मध्यरात्री नतंर चिनावल येथे तब्बल 3 दिवस संचारबंदी जाहीर केली आहे. यामुळे आज दि 18 रोजी सकाळी पोलिस प्रशासनाच्या कडक अंमलबजावणीत गुरे पालक, दुग्ध व्यवसायीक, शेतमजूर यांची मोठी तारांबळ उडाली. अनवधानाने बाहेर पडलेल्या अनेक जणांना पोलिसी खाक्याला सामोरे जावे लागले. या मुळे आज दिवसभरात चिनावलात एक प्रकारे स्मशान शांतता होती त्यामुळे गावात शांतता अनुभवायला मिळाली.

    चिनावल च्या या दंगली ची झळ अक्षरशः देवालाही सोसावी लागत आहे गावात श्रीमद् भागवत पारायण कथा सुरू आहे. मात्र आज लागलेल्या संचारबंदी मुळे सकाळची काकडा आरती,पारायण, हरिपाठ व किर्तन बंद द्वार करण्यात येत असल्याने भाविकांच्या श्रद्धेला ठेच पोहचली आहे,तर गावातील मंदीरे ही आज बंदच होती. या मुळे भाविकांना ” अरे कोंडला कोंडला देव देऊळी कोंडला ” या जनाबाई च्या अभंगांची आठवण झाली.

     

     

     

     

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Chinaval crime news
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ

    November 8, 2026

    गणेशोत्सवातील वादातून तरुणाची निर्घृण हत्या

    November 7, 2026

    नवी मुंबईत गोळीबार : दोन तरुणी गंभीर जखमी

    November 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif