टिचकुल्यासह एकजण जेरबंद ; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

0

जळगाव : दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपारीची कारवाई झालेले उदय रमेश मोची (वय २०, रा. रामेश्वर कॉलनी) व सचिन उर्फ टिचकुल्या कैलास चौधरी (वय २४, रा. रामेश्वर कॉलनी) हे दोघे सुरा घेवून दहशत माजवत होते. एमआयडीसी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील रामेश्वर कॉलनीत सचिन उर्फ टिचकुल्या चौधरी व उदय रमेश मोची या दोघांना पोलीस अधीक्षकांनी दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. मात्र ते दोघेही कोणतीही परवानगी न घेता शहरात वास्तव्यास करतांना आढळून आला. तसेच तो दि. २९ एप्रिल रोजी परिसरात हातात सुरा घेवून दहशत माजवित होते. याबाबतची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सुरा जप्त करण्यात आला असून दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.