हुंड्याचे ५ लाख आणावेत या मागणीसाठी विवाहितेचा छळ

0

चाळीसगाव ;-हुंड्याचे पाच लाख रुपये माहेरहून आणावेत या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी नाशिक येथील सासरच्या मंडळींविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील पिंपळगाव येथील माहेर असलेल्या अंकिता साईनाथ पवार वय २२ नाशिक येथील साईनाथ मल्लू पवार यांच्याशी रितीरिवाजानुसार झालेला असून लग्नाचे सुरूवातीचे काही दिवस चांगले गेले. त्यानंतर विवाहितेला हुंड्याचे पाच लाख रूपये माहेराहून आणावे अशी मागणी करत तिला मारहाण केली. तसेच सासरच्या मंडळींनी विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ केला. त्यानंतर बुधवारी १ मे रोजी सायंकाळी ५ वाजता चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पती साईनाथ मल्लू पवार, सासू छबाबाई मल्लू पवार, ननंद छायाबाई मल्लू पवार, दिर ज्ञानेश्वर मल्लू पवार, जेठ मोहल मल्लू पवार सर्व, ननंद वैशाली शरद राठोड आणि नंदोई शरद उखा राठोड रा. नाशिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विकास चव्हाण हे करीत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.