मोर नदीपात्रातून वाळू उपसा करणाऱ्यांवर धडक कारवाई

0

यावल : अवैधरित्या तालुक्यातील अंजाळे येथील मोर नदीच्या पात्रातून वाळू उपसा करणाऱ्यांवर सहा. पोलीस अधीक्षकांना मिळाली. त्यांनी नदीपात्रात धडक कारवाई करीत तेथून जेसीबी, डंपरसह ट्रॅक्टर जप्त करण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल तालुक्यातील अंजाळे गावातील मोर नदीच्या पात्रात अवैधरित्या जेसीबीच्या साह्याने गौण खनिज उत्खनन होत असल्याची माहिती फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या सहायक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी यावल पोलीस ठाण्यातील पथकाला कारवाईच्या सुचना दिल्या. पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विनोदकुमार गोसावी, पोलीस उपनिरीक्षक सुनील पाटील, पोलीस उपनिरीक्षक विनोद गाभणे, हवालदार अनिल इंगळे, गणेश ढाकणे, अशोक बाविस्कर, वासुदेव मराठे यांचे पथक दाखल झाले. तेथुन जेसीबी क्रमांक (टी. एस. ०१ ई. एल. ७२३९) तसेच डंपर क्रमांक (एम.एच.२७. एक्स १५३७), डंपर क्रमांक (एम.एच.१९. सी. व्ही. ७०९८), डंपर क्रमांक (एम.एच.१९ झेड.५८०४) आणि ट्रॅक्टर क्रमांक (एम. एच. ३७ एल. ५९७३) असे वाहने जप्त केली. तसेच चोरलेली एक ब्रास वाळू असा एकुण २१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

सहायक फौजदार नितीन चव्हाण यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात किशोर अशोक शंकपाळ रा. अंजाळे, रोहित लीलाधर जाधव रा. राहुल नगर भुसावळ, धनराज शांताराम सपकाळे रा. अंजाळे, विलास मुरलीधर कोळी रा. कठोरा, अजय खच्चर, शुभम कालू घोरपडे, शुभम दिलीप सपकाळे, कालू विठ्ठल घोरपडे तिघे रा. अंजाळे व विशाल भावलाल साळवे रा. रमाईनगर अकलुद या नऊ जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरिक्षक विनोदकुमार गोसावी करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.