श्रीराम पाटलांनी नेते, पदाधिकाऱ्यांना वगळले?

0

जिल्हाध्यक्ष, पदाधिकाऱ्यांचे फोटो गायब : कार्यकर्ते नाराज

जळगाव ;- रावेर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार म्हणून श्रीराम पाटील यांना संधी देण्यात आली आहे. श्रीराम पाटील प्रचाराला लागले असून मेळावा देखील घेण्यात येत आहे. श्रीराम पाटील समर्थक नावाने असलेल्या व्हॉट्स ॲप ग्रुपमध्ये सध्या काही पोस्टर, बॅनर व्हायरल होत असून त्यात जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रभैय्या पाटील, माजी आ.संतोष चौधरी आणि खासदार सुप्रिया सुळे यांचे फोटो वगळण्यात आल्याचे दिसत आहे. श्रीराम पाटलांच्या या पोस्टमुळे कार्यकर्त्यांमध्ये देखील नाराजी दिसून येत आहे.

देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून जळगाव जिल्ह्यातील दोन्ही मतदार संघ सध्या चर्चेत आहेत. रावेर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून निष्ठावंत पदाधिकाऱ्यांना डावलून आयात उमेदवार श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आल्याने पक्षात मोठी नाराजी आहे. रावेर मतदार संघातील 220 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले असून आणखी काही लोक राजीनामा देण्याच्या तयारीत आहे. रावेर लोकसभा मतदार संघातून जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्र पाटील, माजी आमदार संतोष चौधरी यांची नावे चर्चेत होती. दोघांना डावलून तिसऱ्याच उमेदवाराला उमेदवारी देण्यात आल्याने संतोष चौधरी देखील बंडाच्या पवित्र्यात आहेत.

सुप्रिया सुळे, रविंद्र पाटील, संतोष चौधरींना वगळले
उमेदवार श्रीराम पाटील आपल्या मतदार संघात जोमाने प्रचाराला लागले असून मेळावे देखील आयोजित केले जात आहे. श्रीराम पाटील यांच्या समर्थनार्थ सोशल मिडियात काही पेज आणि ग्रुप तयार करण्यात आले असून प्रचार केला जात आहे. रावेर तालुका माहविकास आघाडी मेळाव्याच्या एक पोस्टर ग्रुपमध्ये व्हायरल होत आहे. पोस्टमध्ये वॉलपेपरवर खा.सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, माजी आ.संतोष चौधरी यांचे देखील फोटो नसल्याचे दिसून येते.

नाराजी की प्रिंटिंग मिस्टेक?
गेल्या दोन – तीन दिवसात श्रीराम पाटील यांच्या काही पोस्ट सोशल मीडियावर शेअर होत असून त्यात दिग्गज आणि स्थानिक नेत्यांचे फोटो वगळण्यात आले आहेत. उमेदवारीच्या स्पर्धेत असल्याने रविंद्र पाटील व संतोष चौधरी यांचे फोटो वगळले की प्रिंटिंग मिस्टेक असा एक प्रश्न उपस्थित होत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.