Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कांदा विकल्यानंतर खर्च वजा करता उरले फक्त ४०० रुपये
    • सदावर्ते यांच्या गाडीवर शाई, सुपाऱ्या फेकणे पडले महागात
    • पुन्हा एकदा उष्णता आणि पाऊस असे समीकरण
    • पाकिस्तानमधील बन्नू येथे भीषण प्राणघातक हल्ला
    • होर्मुज खाडीत भारतीय जहाजाला टार्गेट करून हल्ला!
    • ‘खरात’ प्रकरणावरून पुन्हा एकदा उडाली खळबळ
    • मुख्यमंत्री होताच थलपती विजयने घेतले तीन मोठे निर्णय
    • पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीसह धोकादायक झाडे, फांद्या हटवा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»सहसंचालकांचा अधिकार आयुक्तांच्या कात्रीत
    जळगाव

    सहसंचालकांचा अधिकार आयुक्तांच्या कात्रीत

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 17, 2024No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    ठेका रद्द करण्यासाठी मुहूर्तच गवसेना : रुग्णवाहिका चालकांचा प्रश्न सुटेना

    जळगाव ;- जिल्हा सामान्य रुग्णालयातील 102 रुग्णवाहिका ठेकेदार असलेल्या मुंबर्इ येथील राजछाया इनोवेटीव्ह सर्व्हिस कंपनीचा ठेका रद्द करण्याचा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे. मात्र ठेका रद्द करण्याचा अधिकार हा सहसंचालकांचा असतांनाही तो आयुक्तांकडे का पाठविला? राज्यातील अन्य ठेके सहसंचालकांनी रद्द केले असतांना जळगावच्या ठेक्यासाठी आयुक्तच का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

    चार महिन्यांपासून संबंधित ठेकेदार हा रुग्णवाहिका चालकांचे मानधन देत नसल्याने त्याच्या विरोधात चालकांनी बंड पुकारण्याचा इशारा दिल्यानंतरही शासकीय यंत्रणा अद्यापही ठोस कारवार्इ करीत नसल्याने ठेकेदाराला कुणीतरी पाठीशी घालत असल्याची शंका आहे. संबंधित ठेकेदार देखील काढता पाय घेण्याच्या तयारीत असतांना त्याचा बचाव अधिकारी कशासाठी करीत आहे; असा प्रश्न उपस्थित होत आहे. सहसंचालक डॉ. विजय बाविस्कर व डॉ. उमेश शिरोडकर यांनी कंपनीचा ठेका रद्द करण्याचा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठविला असतांनाही त्यावर निवडणुकीचे कारण सांगत कारवार्इ करण्यात येत नाही.

    सहसंचालकांचे अधिकार कात्रीत
    राज्यातील अन्य ठेके हे सहसंचालकांच्या अखत्यारित रद्द करण्यात आले असतांना जळगावचा ठेका रद्द करण्यासाठी आयुक्तांच्या आदेश कशासाठी? आयुक्तांकडे निवडणुकीचा पदभार असल्याने ते ठेका रद्द करण्यासाठी तारीख पे तारीख देत आहे. मुळात हा अधिकार सहसंचालकांचा असतांनाही त्यांचा अधिकार कात्रीत का?

    ambulence jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीसह धोकादायक झाडे, फांद्या हटवा

    May 10, 2026

    ‘कला संस्कार शिबिरा’साठी जळगावचा बालचमू कोल्हापूर रवाना

    May 10, 2026

    आंब्यांच्या ‘मॅंगो फिएस्टा’ प्रदर्शनाचे अशोक जैन यांच्या हस्ते उद्घाटन उत्साहात

    May 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif