भुसावळ ;-महिलेचे बंद घर फोडून लोखंडी कपाटातून चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २८ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना शहरातील तुकाराम नगर येथे उघडकीस आली असून याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, प्रियंका विकास तायडे (वय-३८, रा. तुकाराम नगर, भुसावळ) या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १० एप्रिल रोजी दुपारी २.३० वाजता ते कामाच्या निमित्ताने घर बंद करून बाहेर गेले होते. अज्ञात चोरट्याने घर बंद असल्याची संधी साधत घराच्या दरवाजाचे कडी कोयंडा तोडून प्रवेश करत लोखंडी कपाटातून चांदीचे दागिने आणि १ हजार रुपयांची रोकड असा एकूण २८ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. सायंकाळी ७.३० वाजता महिला घरी आल्या. त्यावेळी त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी याबाबत मंगळवारी १६ एप्रिल रोजी भुसावळ बाजारपेठ पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ रमण सुरळकर हे करीत आहे.