भुसावळात ४१ हजारांचे दागिने लंपास ; गुन्हा दाखल

0

भुसावळ ;- शहरातील भीमा कॉलनीत भरदिवसा घरातून ४१ हजार रुपये किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मुकेशी देवी ग्यारशालाल मीना (वय-४५, रा.भीमा कॉलनी, भुसावळ) या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ६ एप्रिल रोजी दुपारी ३ ते ५ वाजेच्या दरम्यान संशयित आरोपी रवी भालेराव (पूर्ण नाव माहित नाही) रा. कवाडे नगर भुसावळ याने घरातील प्लास्टिकच्या डब्यात ठेवलेले सोन्याचे चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ४१ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. ही बाब लक्षात आल्यानंतर मुकेशी देवी यांनी १६ एप्रिल रोजी संशयित आरोपी रवी भालेराव यांच्या विरोधात फिर्याद दिली. त्यानुसार भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक अब्दुल रज्जाक हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.