चौघांनी केली तरुणाला बेदम मारहाण

0

जळगाव : –फरशींसह लोखंडी पट्टी मारून एकाला चौघांनी बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना तालुक्यातील भादली येथे घडली असून याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, तालुक्यातील भादली येथे चेतन गजानन मराठे (वय ३२, रा. रायसोनी नगर, जळगाव) यांना चार जणांनी मारहाण केली. तसेच मारहाणीत डोक्यात फरशी मारण्यासह लोखंडी पट्टीही मारल्याने मराठे यांना दुखापत झाली. ही घटना शनिवार दि. २७ एप्रिल रोजी भादली गावात घडली. या प्रकरणी चेतन मराठे यांनी नशिराबाद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मारहाण करणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउनि संजय जाधव करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.