नवी दिल्ली ;- व्हिएतनाममध्ये आढळणारी ड्रॅगन कोंबडीची किंमत आहे एक लाख रुपयांपेक्षा जास्त आणि या कोंबडीचे नाव आहे ‘ड्रॅगन कोंबडी’ . हिला आता जगभरात मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली असून तिच्या पालनालाही सुरुवात करण्यात आली आहे .
व्हिएतनाम देशात सापडलेल्या एका ड्रॅगन कोंबडीची किंमत लाखोंमध्ये आहे. या कोंबडीच्या जातीचं नाव ‘डोंग ताओ’ असे आहे. ज्याला ड्रॅगन चिकनही म्हटले जाते. या कोंबडीला विकत घ्यायचे असेल तर त्या किमतीत आपल्याकडच्या सगळ्यात महाग कडकनाथ चिकनच्या 200 कोंबड्या खरेदी करता येईल एवढी या ड्रॅगन कोंबडीची किंमत आहे. जगातल्या सर्वात महागड्या कोंबड्यांमध्ये ही कोंबडी आता गणली जाऊ लागली आहे.
ही कोंबडी व्हिएतनाममध्ये जरी सापडली असली तरी याच्या वाढत्या मागणीमुळे जगभरातल्या पोल्ट्री व्यवसायिकांनी या कोंबडीचे पालन करण्यास सुरुवात केली आहे.
डॉन्ग टाओ या ड्रॅगन कोंबडीचं पालन व्हिएतनाम देशात आधी सुरू झालं. शेताच्या एका भागात या जातीच्या काही कोंबड्या पाळल्या. या कोंबड्यांचे पाय ही सामान्य कोंबड्यांपेक्षा वेगळे आहेत काहीसा मोठा आकार आणि दिसायला तपकिरी विटेसारखे. याच खास गुणधर्मामुळे जगभरात या ड्रॅगन कोंबडीला प्रचंड मागणी असते. परदेशात नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये या कोंबडीच्या चिकनला ) सर्वाधिक मागणी असते आणि ते खूप महाग विकल्या जाते.
या कोंबडीत चरबीची मात्रा कमी असल्याने ड्रॅगन कोंबडीला (Dragon Chicken) खाणं लोक पसंत करत आहेत. यासोबतच या कोंबडीचं वजन इतर कोंबड्याच्या तुलनेत अधिक आहे. साधारण 10 किलोच्या चिकनमध्ये फॅटही कमी असल्याने याला मागणी वाढती आहे.
ड्रॅगन कोंबडीची चवीला स्वादिष्ट असल्याने या कोंबडीला असणारी मागणी अधिक आहे. या कोंबडीमध्ये प्रोटीनचे प्रमाण भरपूर असल्याने याचे चिकन तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय होत आहे.