भुसावळात दोन मित्रांना दोघांनी लुटले ! ; ३२ हजारांचा मुद्देमाल घेऊन भामटे पसार

0

भुसावळ ;- रस्त्यावर उभे असणाऱ्या दोन मित्रांना दोन जणांनी येत शिवीगाळ करून त्यांच्याकडून ३० हजारांची रोकड आणि २ हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण ३२ हजारांचा ऐवज घेऊन पोबारा केल्याची घटना रविवारी रात्री घडली असून याप्रकरणी बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिपक देवीदास धनगर वय ३३ रा. अकुलखेडा ता.चोपडा हा तरूण आपल्या परिवारासह राहायला असून तो आणि त्याचा मित्र गणेश असे दोघेजण रविवारी २८ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास भुसावळ शहरातील अष्टभुजा देवी मंदीराजवळ उभे होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या अज्ञात दोन जणांनी त्यांच्याजवळ येवून शिवीगाळ करून दमदाटी केली. यातील दिपक धनगर याच्याजवळील २९ हजारांची रोकड आणि गणेश जवळील दीड हजार व मोबाईल असा एकुण ३२ हजार ५०० रूपये किंमतीचा ऐवज जबरी हिसकावून चोरी नेला. ही घटना घडल्यानंतर सोमवारी २९ एप्रिल रोजी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.