पंतप्रधान मोदींसाठी पुण्यात ‘ही’ खास पगडी !

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

देशभरात निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. बडे बडे नेते संपूर्ण महाराष्ट्रात प्रचारसभा घेत आहेत. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात सभा झाली. भाजपाचे पुण्यातील लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात दाखल झाले होते. यावेळी पुणे शहर भाजपा आणि जिल्हा भाजपाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा पुण्यात येतात त्यावेळी त्यांच्यासाठी हटके अशी एक पगडी तयार केली जाते. त्या पगडीवर मराठी संस्कृती किंवा महाराष्ट्राच्या संस्कृतीचे रेखाटन केलेले असते. पुण्यातील प्रसिद्ध मुरुडकर झेंडेवाले यांच्यातर्फे ही पगडी तयार करुन घेतली जाते. मुरुडकर झेंडेवाले हे पुण्यातील जुने पगडी किंवा फेट्याचे व्यापारी आहेत. यांच्याकडे अनेक प्रकारचे फेटे तयार करुन मिळतात. यापूर्वी 20 वेळा पंतप्रधानांसाठी मुरुडकर झेंडेवाल्यांनी पगडी तयार केली आहे. यावेळी देखील हटके अशी पगडी तयार करण्यात आली असून तिला ‘दिग्विजय योद्धा पगडी’ असे नाव देण्यात आले आहे.

अशी आहे पगडी

संपूर्ण कॉटनची, संपूर्ण हाताने घडवलेली आहे. हवा खेळती रहाण्याची सोय आहे. पंचधातूचा वापर करून बनवलेल्या या पगडीवर शुभचिन्हे आहेत. ऐतिहासिक कोयऱ्या चांदीचे गोल्ड प्लेट्स, शिरोभागी आई तुळजाभवानीची प्रतिमा आहे. तसेच दिग्विजयाला साजेसे सात घोड्यांचा राजेशाही स्टॅन्ड असणारी मराठा युद्धांच्या पराक्रमाची साक्ष देणारी मराठा दिग्विजय पगडी पंतप्रधान मोदी यांचा सन्मान करण्यासाठी बनवण्यात आली.

मोदींसाठी एअर कंडिशन पगडी

पुण्यात सध्या प्रचंड प्रमाणात ऊन तापत आहे. या ऊन्हात उष्णता जाणवू नये, यासाठी या वैशिष्ठपूर्ण पगडीत एअर कंडीशनची सोय करण्यात आली आहे. रिसर्च टीमने पूर्ण अभ्यास करुन ही पगडी तयार केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.