तिघ्रे येथून १ कोटी ८१ लाखांचे बांधकाम साहित्य लांबवीले

0

जळगाव ;- बांधकासाठी लागणारे आरएमसी प्लॅन्ट, चिलर प्लॅन्ट, जनरेटर, पॅनेल कंटेनर, तीन कॉम्प्यूटर सेट, ऑटो लेव्हल मशीन व इतर साहित्य असा एकुण १ कोटी ८१ लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना तालुक्यातील तिघ्रे येथील शेतातील प्लॅन्ट मध्ये रविवारी २८ एप्रिल रोजी दुपारी १२. ३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी सोमवारी नशिराबाद पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील तिघ्रे शिवारातील एका शेतात बांधकाम करण्यासाठी लागणारे साहित्य ठेवण्यात आले आहे. याठिकाणाहून बांधकामासाठी लागणारे साहित्य बांधकामासाठी पुरविले जाते. २८ एप्रिल रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास राहूल सुरेश धांडे वय ४० रा. कोल्हे नगर, जळगाव याने बांधकामाच्या प्लॅन्टमधून आरएमसी प्लॅन्ट, चिलर प्लॅन्ट, पॅनेल कंटेनर, पावर जनरेटर, तीन कॉम्प्यूटर सेट, सहा ऑटेा लेव्हल मशीन व इतर साहित्य असा एकुण १ कोटी ८१ लाख रूपये किंमतीचे साहित्य चोरून नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर येथील सुपरवायझर रंजन प्रसाद रा. भुसावळ यांनी नशिराबाद पोलीसात राहूल धांडे यांच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक महेश घायतड हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.