रेल्वे रुळ ओलांडतांना रेल्वेच्या धडकेत महिलेचा मृत्यू

0

जळगाव ;- रेल्वे रुळ ओलांडतांना रेल्वेची धडक लागल्याने सरलाबाई ईश्वर पाटील (वय ४७, रा. कडगाव, ता. जळगाव) यांचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास असोदा भादली रेल्वेलाईनवर घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव तालुक्यातील कडगाव येथे वास्तव्याला असलेल्या सरलाबाई पाटील या महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. रविवार दि. १९ मे रोजी सायंकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास जळगाव ते आसोदा भादली रेल्वे लाईनवरील खंबा क्रमांक ४२४च्या १४ आणि १६च्या दरम्यान सरलाबाई पाटील या रेल्वे रूळ ओलांडत असतांना त्यांना धावत्या रेल्वेचा धक्का लागला. या धक्क्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर नशिराबाद पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचानामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. याप्रकरणी नशिराबाद पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश घायतड हे करीत आहे. महिलेच्या पश्चात पती आणि मुलगा असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.