जळगाव -: मिरवणुकीत नाचतांना धक्का लागल्याच्या कारणावरुन तरुणासोबत वाद घालीत त्याला शिवीगाळ करीत फायटरने मारहाण केली. ही घटना दि. १४ रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
दरम्यान रात्री अकरा वाजता शहरातील जय कलेक्शन जवळ एका मिरवणुकीजवळ सागर शालिक सपकाळे (वय ३८ रा. समता नगर) हा तरुण नाचत असताना त्याचा धक्का विशाल बाविस्कर याला लागला. याचा राग आल्याने विशालने हातातील फायटरने सागर सपकाळे मारहाण करून दुखापत केली, दरम्यान या घटनेबाबत सोमवार दि. १५ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास शहर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. त्यानुसार मारहाण करणारा विशाल बाविस्कर रा. जळगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास महिला सहायक फौजदार संगीता खांडरे ह्या करीत आहे.