Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतर रोड आता आंदोलनापासून वंचित!
    • मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ
    • गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख
    • अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट!
    • अपहरणाचा संशय : विमानाचे आपत्कालीन लँडिंग
    • पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन
    • ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी भारत एक मोठी बाजारपेठ
    • दुष्काळी मदतीसह आणखी तीन मोठे निर्णय!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»श्रीरामनवमीनिमित्त मंगळग्रह मंदिरात प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मदिवस साजरा
    जळगाव

    श्रीरामनवमीनिमित्त मंगळग्रह मंदिरात प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मदिवस साजरा

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 17, 2024No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर :;- येथील श्री मंगळग्रह मंदिरात श्रीरामनवमीनिमित्त दरवर्षीप्रमाणे प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मदिवस अतिशय भक्तिमय आणि चैतन्यमयी वातावरणात साजरा झाला. याप्रसंगी मंदिरात प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्रतिमेची आरास करण्यात आली. तसेच प्रभू श्रीरामचंद्रांचा पाळणा विविध फुलांनी आकर्षक पद्धतीने सजविण्यात आला होता.

    शहरातील लकी-अनुष्का ॲडव्हर्टायझिंग एजन्सीचे संचालक योगेश महिंद हे सपत्नीक महापूजेचे मानकरी होते. त्यांच्या शुभ हस्ते गणपती पूजन, वरुणदेवता पूजन झाले. प्रभू श्रीरामांच्या मूर्तीवर मंत्रोचारासह विविध मंत्रोचारात अभिषेक होऊन मूर्ती पाळण्यात ठेवण्यात आली. त्यानंतर पाळण्यातील मूर्तीचे पूजन होऊन दुपारी बारा वाजता प्रभू श्रीरामचंद्रांचा पाळणा म्हटला गेला. यावेळी प्रभू श्रीराम नामाचा जयघोष करीत विविध स्तुतीपर गीते गायिली गेली. त्यानंतर गणपती व श्रीरामांची महाआरती होऊन भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला.

    मंगळग्रह मंदिराचे पुरोहित जयेंद्र वैद्य, अतुल दीक्षित, गणेश जोशी, मंदार कुलकर्णी, अक्षय जोशी यांनी पौरोहित्य केले.
    मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर यांच्यासह मंगल सेवेकरी प्रकाश मेखा, पुषंद ढाके व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Amlner
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ

    October 14, 2026

    गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख

    October 14, 2026

    पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन

    October 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif