एमआयडिसीतील केमिकल कंपनीला भीषण आग ; १५ कर्मचारी जखमी

0

 

जळगाव : – जळगाव एमआयडीसी परिसरातील डब्ल्यू सेक्क्टर मधील केमिकल कंपनीत भीषण आगीची घटना आज सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास घडली.असून आगीत १५ कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावरखासगी दवाखान्यात उपचार सुरु आहे. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही . महापालिकेच्या ६ ते ७ अग्निशमन बंबांनी हि आग दुपारी १२ वाजेपर्यंत आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. दरम्यान जखमी व भाजलेल्या कामगारांना तातडीने मेहरून येथील सारा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.

एमआयडीसी परिसरातील गोपाल दालमिल जवळ मौर्या ग्लोबल केमिकल कंपनीत आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास ही आगीची घटना घडल्याचे सांगितले जात आहे. आग एवढी भीषण होती की त्यात कंपनीचे 15 कर्मचारी जखमी झाले असून त्यांना तातडीनेराम नगरातील एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान घटनास्थळी अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले असून आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

जखमी कामगार यांची नावे
हेमंत गोविंदा भंगाळे वय- 27, प्रभात कॉलनी, मयूर राजू खैरनार वय-२७, रा.जुना खेडी रोड, विशाल रवींद्र बारी व -२८,रा. श्रीकृष्ण नगर, जुने जळगाव, सचिन श्रावण चौधरी वय-२४, रा.रामेश्वर कॉलनी, गोपाल आत्माराम पाटील रा. विखरण ता.एरंडोल ह. मु. अयोध्या नगर, भिकन पुंडलिक खैरनार वय-४२, रा. इच्छादेवी चौक, चंद्रकांत लक्ष्मण पाटील वय-२४, रा. धुळे ह.मु. रामेश्वर कॉलनी, जगजीवन अनंत परब वय-५३, रा.आयोध्या नगर, रमेश अजमल पवार वय-२१, रा. रामेश्वर कॉलनी, नवाज समीर तडवी वय -५१, रा.अशोक किराणा दुकान, रामेश्वर कॉलनी, दीपक वामन सुवा वय -25, रा.विठोबा नगर, कालिका माता नगर, नंदू छगन पवार वय-३५, रा. रामेश्वर कॉलनी, कपिल राजेंद्र पाटील वय-२४, रा. आव्हाने ता. जळगाव ,आनंद छगन जगदेव वय-38 रा. रामेश्वर कॉलनी, गणेश रघुनाथ सोनवणे वय-५०, रा. सुप्रीम कॉलनी, फिरोज रज्जाक तडवी वय-४०, रा. रामेश्वर कॉलनी, किशोर दत्तात्रय चौधरी वय-50 रा. रामेश्वर कॉलनी, चंद्रकांत दशरथ घोडेरावत वय-47 रा रामेश्वर कॉलनी, जळगाव.

Leave A Reply

Your email address will not be published.