सांगली: – भरधाव कुझर पाठीमागून ट्रॅव्हलर्सवर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात क्रुझरमधील सातजण जागीच ठार झाले. सांगलीतील विजापूर-गुहागर महामार्गावर जांभुळवाडीनजीक (ता. कवठेमहांकाळ) येथे बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही दुर्घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की, क्रु झरचा चक्काचूर झाल्यानंतर पेट घेतल्याने मदत कार्यात अडथळे आले. कु झरचे तोंड निम्मे ट्रॅव्हलर्समध्ये घुसले होते. घटनास्थळी हाडामासांचा चिखल तसेच रक्ताचा सडा पडला होता.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, जमखंडी (ता. बागलकोट, कर्नाटक) येथून क्क्रु झरमधून लग्नासाठी वऱ्हाड सावर्डे (ता. तासगाव, जि. सांगली) येथे निघाले होते. दोन क्रुझर तसेच नवरी क्रूझरचा अपघात झाल्यानंतर गाडीचा चक्काचूर झाल्यानं मृतदेह बाहेर काढण्यात मोठ्या अडचणी आल्या. अपघातानंतर क्रूझरनं पेट घेतल्यानं मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होता. मात्र घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन अग्निशमन दलाला पाचारण केलं. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवत मृतदेह बाहेर काढून बचावकार्य केलं.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Prev Post