फत्तेपूर, ता. जामनेर ;- येथून जवळच असलेल्या राज्य मार्ग क्रमांक ४४वरील पिंपळगाव पिंप्री येथे १७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास अचानक लागलेल्या – आगीत ७ घरे जळून खाक झाली. तसेच गोठ्यात बांधलेल्या १६ शेळ्यांचा होरपळून मृत्यू झाला. तर घरासमोर उभ्या असलेल्या दोन दुचाकी आगीत भस्म झाल्या असून चार बैल व दोन वासरू आगीत गंभीर जखमी झाले आहे. सुर्दैवाने या आगीत जीवीतहानी टळली.
या आगीत अन्न-धान्य, शेतीची औजारे, कपडे, भांडी यांच्यासह जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. रा या आगीमध्ये वासुदेव शिवलाल पाटील, ज्ञानेश्वर शिवलाल पाटील, संतोष शिवलाल पाटील, संजय हरी बेटोदे, जीवन समाधान पाटील, प्रवीण समाधान पाटील, धनराज सोनजी आहीर अशा सात कुटुंबांची घरे जळून खाक झाली आहेत. दरम्यान, फत्तेपूर पोलीस ठाण्याचे सपोनि गणेश फड, ग्रेडेड पो. उपनिरीक्षक जयसिंग राठोड, पो.ना. दिनेश मारवडकर, तलाठी राजेंद्र सुपेकर, पशुधन विकास अधिकारी यांनी भेट दिली .