जळगावातून अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवले

0

जळगाव : शहरातील एका भागात राहणाऱ्या एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेले. ही घटना सोमवार दि. १५ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी मंगळवार दि. १६ एप्रिल रोजी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील एका भागात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. सोमवार दि. १५ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता मुलगी ही घरी असताना तिला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेले. ही बाब मुलीच्या नातेवाईकांना समजली. त्यामुळे त्यांनी मुलीचा सर्वत्र शोध घेतला, परंतु तिच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यामुळे अखेर मंगळवार दि. १६ एप्रिल रोजी तालुका पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.