धक्कादायक; निवडणूक ड्युटीवर असताना पोलीसाने स्वतःवर झाडली गोळी…

0

 

छत्तीसगड, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज संपले. दरम्यान, छत्तीसगडमध्ये एका जवानाने स्वत:वर गोळी झाडल्याची बातमी समोर येत आहे. मध्य प्रदेश विशेष सशस्त्र दलाच्या जवानाने आज गरियाबंद जिल्ह्यात निवडणूक ड्युटीसाठी आलेल्या जवानाने आपल्या सर्व्हिस रायफलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. आज 13 राज्यांमध्ये 88 जागांसाठी निवडणूक झाली.

सकाळी घडलेली घटना

गरीयाबंद हे महासमुंद लोकसभा मतदारसंघात येते, जिथे आज शुक्रवारी सार्वत्रिक निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे. माहिती देताना पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही घटना सकाळी 9.30 च्या सुमारास पिपरखेडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुडेरदादर गावातील एका सरकारी शाळेत घडली, जिथे सुरक्षा कर्मचारी निवडणूक कर्तव्यासाठी आले होते.

सर्व्हिस रायफलने स्वतःवर गोळी झाडली

ते पुढे म्हणाले की, हेड कॉन्स्टेबल जियालाल पवार याने तेथील एका खोलीत आपल्या सर्व्हिस रायफलने स्वत:वर गोळी झाडली. हेडकॉन्स्टेबल पवार राखीव दलात होते आणि त्यांना मतदानासाठी तैनात करण्यात आले नव्हते. ते मध्य प्रदेश विशेष सशस्त्र दलाच्या 34 व्या बटालियनमध्ये होते. अधिका-यांनी पुढे सांगितले की, माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. घटनास्थळी आम्हाला कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.