प्रेरणादायक; एकाच कुटुंबातील पाच पिढ्यांतील 70 सदस्यांनी केलं मतदान…

0

 

जोधपुर, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. जोधपूरमध्ये (जोधपूर लोकसभा निवडणूक) एकाच कुटुंबातील पाच पिढ्यांतील 70 सदस्य मतदानासाठी आले होते. ज्या भागात मतदान कमी होत आहे, त्यांच्यासाठी हे चित्र नक्कीच प्रेरणादायी ठरेल. पुरुषांनी राजस्थानी पगडी तर महिलांनी लाल चुंदरी साडी परिधान केली होती. या कुटुंबात प्रथम मतदार (जे पहिल्यांदा मतदान करत आहेत) तसेच मुलेही होती, जी भविष्यात मतदार होतील.

याच कुटुंबातील एका सदस्याने सांगितले की, लोकशाहीचा सण उत्साहात साजरा करायचा हे आम्ही काल ठरवले होते. राजस्थानच्या संस्कृतीचे प्रतीक असलेला साफा (पगडी) घालू आणि महिला चुंदरी साडी नेसतील असे आम्ही ठरवले. आमच्या कुटुंबातील काही लोक पहिल्यांदाच मतदान करत आहेत. भारताचे नाव जगातील सर्वात शक्तिशाली लोकशाही म्हणून ओळखले गेले पाहिजे, असा संदेश आम्हाला जनतेला द्यायचा आहे, असेही ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.