सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएम-व्हीव्हीपॅटबाबतच्या सर्व याचिका फेटाळल्या

0

नवी दिल्ली ;- इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्स मतांची त्यांच्या व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल स्लिप्ससह १०० टक्के पडताळणी करण्याच्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयाने या सदर्भातील नवीन निर्देश देखील निवडणूक आयोगाला दिले आहेत. या पूर्वी न्यायालयाने दोनवेळी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट याचिका संदर्भातील निकाल राखून ठेवला होता.

त्यानंतर आज (दि.२६) सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी या सदंर्भातील सर्व याचिका फेटाळल्या आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयाने बॅलेट पेपर मतदानाकडे परत जाण्याची याचिकाही फेटाळली

न्यायाधीश संजीव खन्ना म्हणाले, “आम्ही दोन निर्देश दिले आहेत. त्यातला पहिला निर्देश म्हणजे चिन्ह लोड झाल्यावर सर्व युनिट सिल करावं आणि चिन्ह स्टोअर युनिटला किमान 45 दिवस ठेवलं जावं.” निवडणूक प्रक्रियेवर भरवसा न ठेवणं संशय निर्माण करू शकतं” असंही कोर्टानं म्हटलं.

Leave A Reply

Your email address will not be published.