दुसऱ्या टप्प्यातील ८ मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत ४३.०१ टक्के मतदान

0

मुंबई ;- राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.२६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदार संघात दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४३.०१ टक्के मतदान झाले आहे.

दुसऱ्या टप्प्यातील एकूण ८ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

वर्धा – ४५.९५ टक्के, अकोला -४२.६९ टक्के, अमरावती – ४३.७६ टक्के, बुलढाणा –  ४१.६६  टक्के, हिंगोली –  ४०.५० टक्के, नांदेड –  ४२.४२ टक्के, परभणी -४४.४९ टक्के, यवतमाळ – वाशिम -४२.५५ टक्के

महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात 8 जागांसाठी मतदान पार पडत आहे. बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. या दुसऱ्या टप्प्यात विदर्भात 5 आणि मराठवाड्यात 3 मतदारसंघात मतदान होणार आहे. राज्यात एकूण 204 उमेदवार रिंगणात आहेत. यासाठी एकूण 16 हजार 589 मतदान केंद्रांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या निवडणुकीत 1 कोटी 49 लाख 25 हजार 912 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.