मोठी बातमी; तारक मेहता शो मधील सोढी चार दिवसांपासून बेपत्ता; वडिलांनी दाखल केली एफआयआर…

0

 

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये रोशन सिंग सोधीची भूमिका साकारणारा अभिनेता गुरचरण सिंग दिल्ली विमानतळावरून अचानक बेपत्ता झाला. ते दिल्ली विमानतळावरून मुंबईला रवाना होणार होते, पण ते ना मुंबईला पोहोचले आणि ना घरी परतले. गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या गुरचरणबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. आता त्याच्या वडिलांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केली आहे. या एफआयआरमध्ये लिहिले आहे की, माझा मुलगा गुरचरण सिंग, जो 50 वर्षांचा आहे, 22 एप्रिल रोजी सकाळी 8.30 वाजता मुंबईला निघाला होता. फ्लाइट घेण्यासाठी तो विमानतळावर पोहोचला. पण तो ना मुंबईला पोहोचला ना घरी परतला. त्याचा फोन नॉट रीचेबल आहे. तो पूर्णपणे मानसिकदृष्ट्या स्थिर असून आम्ही त्याचा शोध घेत आहोत. मात्र अद्याप काहीही कळू शकले नाही.

गुरचरण सिंग शेवटचा टीव्ही शो तारक मेहता का उल्टा चष्मा मध्ये रोशन सिंग सोधीच्या भूमिकेत दिसला होता. वडिलांच्या प्रकृतीमुळे त्याने शो सोडला कारण त्यावेळी त्याला आपल्या कुटुंबावर लक्ष केंद्रित करायचे होते. मात्र, शो सोडणे त्याच्यासाठी सोपे नव्हते. शोच्या इतर कलाकारांप्रमाणेच त्यांची थकलेली रक्कमही वेळेवर मिळाली नव्हती.

आता गुरचरण सिंग अचानक बेपत्ता झाल्याच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. कुटुंबीयांनी एफआयआर दाखल केला आहे मात्र अद्यापपर्यंत अभिनेत्याबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही. आशा आहे की तो सुरक्षित असेल आणि हे प्रकरण लवकरच निकाली निघेल.

Leave A Reply

Your email address will not be published.